Ad will apear here
Next
पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या धुळाप्पांचा सत्कार!


पुणे :
कृष्णा नदीला नुकत्याच आलेल्या महापुरात स्वतःच्या जिवावर उदार होऊन सुमारे पाच हजार जणांचे प्राण वाचवणाऱ्या धुळाप्पा आंबी (पुजारी) या नावाड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे ११ हजार रुपये, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला आहे. 

आलास (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले नरसोबाच्या वाडीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेले गाव. धुळाप्पा याच गावातील एक गरीब रहिवासी. नावेतून लोकांना पैलतीराला सोडणे या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. नुकत्याच आलेल्या महापुरातून त्यांचे गावही वाचले नाही. हे गाव तसे टोकाला असल्याने एनडीआरएफ किंवा प्रशासनाची मदत पोहोचायला थोडा उशीर झाला; मात्र अशा परिस्थितीत धुळाप्पांनी योगेश आणि गजानन या आपल्या दोन मुलांसह लोकांना वाचवण्याचे काम हाती घेतले. स्वतः नावाडी असल्याने होडी चालवणे ही गोष्ट त्यांच्यासाठी कठीण नव्हती; पण रौद्रभीषण प्रलयात होडी चालवणे हे खूप धोकादायक आणि आव्हानात्मक काम होते. त्या स्थितीतही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आठवडाभरात पाच हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवून त्यांची पुरातून सुटका केली. सलग १२-१२ तासही त्यांनी होडी चालवली. धुळाप्पांच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आबा बागुल यांनी त्याच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, घनःश्याम सावंत, रमेश भंडारी, अमित बागुल, संजय पवार, कपिल बागुल, विलास रत्नपारखी, सागर आरोळे, संतोष पवार, रजपूत, धनंजय कांबळे, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, महेश ढवळे उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSBCD
Similar Posts
‘आर्यन्स’चे कर्मचारी, पालक पूरग्रस्तांच्या मदतीला पुणे : पुराच्या तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील गावांमध्ये अनेक ठिकाणांहून मदत पोहोचत आहे; पण आभाळच कोसळल्यावर ठिगळ तरी कुठे, कुठे लावणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे या मदतीच्या हातांमध्ये आपलाही एक हात असावा या उद्देशाने आर्यन्स वर्ल्ड स्कूल संस्थेने पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पुणे : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, पूरग्रस्तांना शासनासह विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवली जात आहे. या भागातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. आवश्यक शैक्षणिक साहित्याच्या दोन लाख २० हजार किट्सची गरज होती. त्यापैकी एक लाख पाच हजार किट्स उपलब्ध झाली आहेत
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language